मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ची मदत मागितली आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने एनसीबीला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये याप्रकरणातील ड्रग अँगलचा तपास करण्यासाठी मदत मागितली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल तर नाही हे जाणून घेण्याचा हेतू आहे.
ईडीने बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर 31 जुलै रोजी मनी लॉन्ड्रिंग केस दाखल केली होती. बिहार पोलिसांनी हा एफआयआर सुशांत सिंह रापजूतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर दाखल करून घेतला होता. या प्रकरणी याआधीच ईडीने सुशांतचे वडील, सुशांतची बहिण प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांचे जबाब नोंदवले आहेत. ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, वडिल इंद्रजीत यांचे जबाबही नोंदवले आहेत. याव्यतिरिक्त ईडीने सुशांतचा माजी मॅनेजर, रूममेट सिद्धार्थ पिठानी, हाऊस मॅनेजर सॅमुअल मिरांडा, सीए संदीप इत्यादींची चौकशी केली आहे.