मुंबई : काहीही झालं तरी मी भारतालाच पाठिंबा देणार, असे टेनिसपटू सानिया मिर्झाने आपला पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकला सुनावल्याची बाब आता पुढे आली आहे.
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने जेव्हा शोएबबरोबर लग्न केले, तेव्हा एक वाद निर्माण झाला होता. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत. त्यामुळे सानियाने लग्न करण्यासाठी जेव्हा पाकिस्तानच्या शोएबची निवड केली होती तेव्हा तिच्यावर सडकून टीका झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सानियाने शोएबशी लग्न केले असले तरी तिचा पाठिंबा भारतालाच असेल, हे तिने त्याच्याशी लग्नापूर्वीच स्पष्ट केले होते. कारण लग्नानंतर हा प्रश्न ऐरणीवर येणार होता. सानिया भारतामध्येच मोठी झाली, तिला एक टेनिसपटू म्हणून प्रेम भारताने दिले आहे. त्यामुळे तिने यापुढेही भारतालाच पाठिंबा देण्यात असल्याचे शोएबबरोबर स्पष्ट केले होते.
सानियाची नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये सानियाने या गोष्टीचा खुलासा केला आहे. याबाबत सानिया म्हणाली की, ” लग्न होण्यापूर्वी मी आणि शोएब डेटिंग करायचो. एकमेकांना भेटायचो, बोलायचो. त्यावेळी हा मुद्दा आपल्या बोलण्यात असायचा. कारण माझे लग्न पाकिस्तानच्या मुलाबरोबर होणार होते. त्यावेळी मी शोएबला ठणकावून सांगितले होते की, यापुढे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचा मुद्दा येईल तेव्हा माझा पाठिंबा हा नेहमीच भारताला असेल.”