सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी 916 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 29 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर दोन रूग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील बळी संख्या 405 झाली आहे. तर एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 411 झाली आहे.
बुधवारी 29 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. तब्बल 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 10 पुरूष आणि 9 महिला रूग्णांचा समावेश आहे. शेळगी परिसरातील 59 वर्षाच्या महिलेचा यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तर बसवराज नगर जुुळे सोलापुरातील 58 वर्षाच्या पुुरूषाचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 411 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 744 तर 2 हजार 667 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 405 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 271 तर महिला 134 रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 916 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 887 अहवाल निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 59 हजार 345 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 52 हजार 715 तर 6 हजार 411 पॉझिटीव्ह अहवाल आढळून आले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 43 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 996 आहे. कोरोनामुक्तीचा आकडा पाच हजाराच्या उंबरठ्यावर आहे.