मुंबई : प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं कळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीतल नावाजलेले नाव आहे. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. मांजरेकर यांना काल बुधवारी खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचं कळतं. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबी पोलीस लवकरच शोधून काढणार असल्याचे सांगितले.
मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनीही खंडणी मागणाऱ्याला दादरमधून अटक केली आहे. यासाठी आरोपीनं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाचा वापर केला. मात्र, आरोपी आणि अबू सालेम याचा काहीही संबंध नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. मात्र तरी देखील आरोपीचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, ही माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.