सोलापूर : सोलापूर शहर आणि ग्रामीणची तुलना केली असता शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येत ब-यापैकी घट झाली आहे. त्यात आजच्या शहर अहवालात 59 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत शहरात कोरोनावर मात केलेल्याची संख्या पाच हजार पार झाली आहे.
सोलापूर शहरात आज गुरूवारच्या अहवालानुसार नवीन 40 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील बळी संख्या 406 झाली आहे तर एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 451 झाली आहे. आता पर्यंत पाच हजार 22 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 451 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 771 तर 2 हजार 680 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 406 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 271 तर महिला 135 रुग्णांचा समावेश आहे. गुरूवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 1 हजार 75 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 35 अहवाल निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 60 हजार 294 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 53 हजार 750 अहवाल तर 6 हजार 451 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 23 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 22 झाली आहे. सलगर वाडी देगांव रोड परिसरातील 51 वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान हॉस्पिलमध्ये मृत्यू झाला आहे.