मुंबई : क्रिकेट आणि सिनेक्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असलेले जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. त्यातच आता त्यांच्या या प्रेमाच्या झाडाला मोहर फुटणार आहे. कारण नवीन वर्षात कोहली कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज स्वतः विराट कोहलीने दिली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोला जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असे कॅप्शन दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आदर्श जोडींपैकी एक मानली जाते. आता विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर करत, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन देत. जानेवारी 2021 ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले. विराटनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विराट आणि अनुष्का यांचा विवाह डिसेंबर 11, 2017 रोजी इटलीमध्ये झाला. मोजक्या लोकांसह विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये विराट-अनुष्काची जोडी विरुष्का म्हणून प्रसिद्ध आहे.
विराट सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएइला आला असून अनुष्का मुंबईत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विराट-अनुष्का एकत्र मुंबईतील त्यांच्या घरी होते. याकाळात दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. याचे फोटो आणि व्हिडीओ विराट-अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असतं. विराट आणि अनुष्कानं दिलेले हे सरप्राइज चाहत्यांसाठी खास आहे