विरवडे बु : सध्या सर्वत्र गौरी – गणपतीच्या पूजनाचे भक्तिमय वातावरणात पूजन केले जात असताना विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील परिवर्तनवादी युवक प्रशांत प्रकाश देशमुख यांनी गौरी गणपती पूजनाबरोबरच पाच रणरागिणीची प्रतिष्ठापना केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेचे धडे देणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेब, स्त्री शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले, आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, रणांगणात शत्रूला सळो कि पळो करून सोडणाऱ्या महाराणी ताराराणी, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रीवादी ताराबाई या 5 प्रतिमेचे पूजन करून प्रशांत देशमुख यांनी परिवर्तन वादी वाटचालीस सुरुवात केली आहे.
घरात पूर्वीपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरेला थोडीशी बगल देत त्यांनी थोरांचे विचार व त्यांचे कार्य याची सर्वांना माहिती व्हावी, म्हणून मी गेल्या चार वर्षापासून पाच प्रतिमेचे पूजन करत असल्याचे प्रशांत देशमुख यांनी सांगितले. त्यांना या कामात सर्व कुटुंब मदत करत आहेत.
संकलन : प्रकाश गव्हाणे, विरवडे बु. सुराज्य डिजिटल