बेळगाव : बेळगावमध्ये मनगुत्ती गावानंतर पुन्हा एकदा पुतळ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. पिरणवाडी गावात संगोळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे बेळगावात पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे पिरनवाडी गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहेत.
रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. अशात कन्नड संघटनांनी मध्यरात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे. तर रायन्ना यांचा पुतळा इतर ठिकाणी हलवा, अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सगळ्यामुळे पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला होता. मनगुत्ती इथलं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला होता. मनगुत्ती गावामध्ये 9 ऑगस्टला मराठी भाषिकांनी आंदोलन केले होते.