मुंबई : सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन जवळपास अडीच महिने झाले आहेत. अभिनेत्याचे कुटुंबिय, चाहते, मित्र सर्वजण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रोज या तपासात वेगळीच माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या चौकशीनंतर या प्रकरणात अनेक वळणं येत आहेत.
सुशांतच्या निधनानंतर मुंबई पोलीस म्हणाले त्याने आत्महत्या केली पण कपूर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यांने धक्कादायक खुलासा केला आहे. एका रिपोर्टनुसार हा तोच कर्मचारी आहे जो सुशांतच्या निधनानंतर त्याची बॉडी पोस्टमार्ट ते स्मशान भूमीपर्यंत घेऊन गेला होता. त्या व्यक्तीने असा दावा आहे की, सुशांतला ठार मारण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्या कर्मचाऱ्यांने दावा केला आहे की, सुशांतला ठार मारण्यात आले. एका खासगी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप श्वेताने शेअर केली आहे, ज्यात त्या व्यक्तीने सुशांतच्या मृतदेहाबद्दल बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
व्हिडीओत हा कर्मचारी म्हणतोय, आम्हाला फक्त हे माहित होते की हा खून आहे. हा खूनच होता जे निशाण होते ते सुईचे होते. त्याच्या गळ्यावर निशाण होते. 15 ते 20 गळ्याभवती निशाण होते आणि गळ्याला काही सेलो टेप चिटकली होती. या कर्मचाऱ्यांने दावा केला की हॉस्पिटलमधील मोठे – मोठे डॉक्टरांचे देखील म्हणणे होते की हा खून आहे.