सोलापूर : न्यू पाच्छा पेठेतील कोंचीकोरवी गल्लीतील टाकलेल्या मटका धाड प्रकरणातील प्रमुख आरोपी सुनील कामाठीच्या पत्नीची आणि दुसरा भागिदार त्याचा पुतण्या आकाश याच्या आईची पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. सुमारे दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणात आतापर्यंत 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 17 लाईनदार तर उर्वरित एंजटांचा समावेश आहे. आकाश कामाठीसह चौघे पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणातील प्रमुख बुकी नगरसेवक सुनील कामाठी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
* आरोपींबद्दल माहिती असल्यास कळवा : डोंगरे
या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांना या प्रकरणातील आरोपींबद्दल कोणतीही माहिती असल्यास आणि शहरात कुठेही मटका सुरू असल्यास आपल्या 7507133100 या क्रमांकावर कळवावे, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. संबंधित नागरिकांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी सांगितले.