पंढरपूर : विठ्ठल मंदिर दर्शनासाठी सुरु करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने आज सोमवारी आंदोलन सुरु केले आहे. माञ या आंदोलनात प्रमुख महाराज मंडळी अनुपस्थित असल्याने वारक-यांनी देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. माञ राज्यभरातून आलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून शिवाजी चौकात भजन आंदोलन सुरु केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. शासनाचे प्रतिनिधि म्हणून आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार हे शिवाजी चौक, मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराद्वारे प्रत्येक घटना कैद करीत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे सकाळीच पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. माञ दुपारी बारा वाजेपर्यंत ते आंदोलनस्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे आंदोलक शिवाजी चौकात भजन आंदोलन करीत आहेत. एक लाख वारक-यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. माञ अंदाजे एक हजार आंदोलकांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरु आहे.