मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक मोठी गोष्ट समोर आली. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील या प्रकरणाचा अत्यंत गाभीर्याने तपास करत आहे.
एनसीबीने काल सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रियाला जामीन मिळू नये यासाठी, एनसीबी रियाविरोधात आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते.
अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून रिया आणि तिच्या भावा शिवाय, बॉलीवुडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावेही जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवुड पार्टीजमध्ये ड्रग्स घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावरही ड्रग्सचा वापर करणे आणि डीलिंग’ करण्याचा आरोप आहे.
* रिया कायदेशीर कारवाई करणार
रियाने सुशांतच्या कुटुंबियांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. रियाच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालय त्याचप्रमाणे तपास यंत्रणांना खोटी विधानं दिली आहेत. त्यामुळे याच कारणावरून सुशांतच्या कुटुंबियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा निर्णय तिने घेतलाय. रियाचे वकील सतिश मानशिंदे याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘डॉक्टरांच्या प्रक्रिप्शनची आणि सुशांतच्या दोन्ही बहिणींच्या चॅट्सची माहिती घेण्यात आली. यावरून सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या मानसिक आरोग्यविषयीची माहिती असल्याचं स्पष्ट होतं आहे.
‘सुशांतच्या औषधांचं प्रिक्रिप्शन बहिणींना एकमेकींना पाठवलं होतं. याबाबत त्या ईडी आणि कोर्टासमोर खोटं बोलत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांचा घेतलेला सल्ला देखील बेकायदेशीर होता. मुख्य म्हणजे रूग्णाचा इतिहास माहिती असल्याशिवाय डॉक्टर औषधं लिहून देत नाहीत. त्यामुळे यानंतर रिया सुशांतच्या कुटुंबियांविरोधात कारवाई करणार असल्याचं, अॅड. मानशिंदे यांनी सांगितले.