बार्शी : येथील सोलापूर रस्त्यावरील वसाहतीत कोरोना देवी नामक देवीची स्थापना करुन या देवीची भक्ती केल्यास कोरोना बरा होतो, अशी अफवा पसरविल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ परशुराम पवार वय 42 वर्षे, ताराबाई भगवंत पवार (वय 52 वर्षे, दोघेही रा. सोलापुर रस्ता, बार्शी ) अशी अरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पो.कॉ. रविकांत चंद्रकांत लगदिवे यांनी फिर्याद दिली आहे. या अरोपींनी कोरोना देवीचे मंदिर तयार करुन त्यात देवीची स्थापना केल्याचे जाहीर केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच लोकांना देवीला नैवेद्य वाहिल्यास मास्क वापरण्याची गरज नाही. आम्ही इतके दिवस झाले, देवीची पूजा करतो म्हणून आम्हाला मास्क न वापरता तसेच इतर कोणतीही काळजी न घेता आता पर्यंत काही झाले नाही. देवीची ओटी भरल्यास कोरोना रुग्ण देखील बरा होतो, अशी अफवा पसरवुन लोकांची दिशाभूल केली.
तसेच कोरोना रोगाचा प्रसार होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलमान्वये, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.