मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे’, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
शिवसेना खासदार ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवतात’, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. मात्र, त्यांच्या याच विधानाला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत’, अशी टीका
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विरोधकांकडून होत आली आहे. अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात.
बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. मात्र उद्धवजींना एकच विनंती की मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा’, असे म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांना देखील सुनावले आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी आधी नरेंद्र मोदींनाही असे काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा हे सांगण्याचे धाडस करावे’, असेही राऊत म्हणाले होते.
* पंतप्रधानांनी संपूर्ण देश पालथा घालावा
सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे हे माहिती असतानाही विरोधक असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असे सागण्याचे धाडस करावे”, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.