मुंबई : राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरु आहे, तो याआधी कधीच नव्हता असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार चालवतात अशी टिका वारंवार भाजपकडून केली जाते. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून आहेत , अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. भाजपने मुख्यमंत्र्यांवर टिका केल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी पवारांचे नातू रोहित पवार धावून आले आहेत.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना? ‘ असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.
कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी पुण्याचा दौरा केला होता आणि कोकणात चक्रीवादळ आल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी त्यांना केली होती. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळात संपूर्ण राज्याचा दौरा केला तसेच आता विदर्भातील पुराची पाहणी करण्याकरता ही त्यांचा दौरा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. यास शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी चोख उत्तर दिले आहे.
* मुख्यमंत्री 15 तास काम करतात – थोरात
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. आम्ही तिथं पूरस्थितीच्या ठिकाणी जाणं योग्य नसतं. प्रशासन काम करत आहे, मुख्यमंत्रीही दररोज 15 तास काम करतात. सर्वच स्थितीवर ते काम करत असून परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन आढावा घेतात, असेही थोरात यांनी म्हटलं आहे.