सांगली : सांगली, मिरज मनपा क्षेत्रात 7 हजार 348 रुग्णसंख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यात आज गुरुवारच्या अहवालानुसार 24 मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे 716 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज अखेरची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 8 हजार 90 रुग्ण बरे झाले आहेत.
716 ची भर पडल्याने आता एकूण बाधितांची संख्या 14 हजार 613 झाली आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये 566 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात 5 हजार 957 रुग्ण उपचाराखाली आहेत. गुरुवारी 411, rt-pcr टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 161 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 1984 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी 567 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरूवारची तालुकानिहाय नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 45,जत 12, कडेगाव 69, कवठेमहांकाळ 35, खानापूर 38, मिरज 82, पलूस 48, शिराळा 29, तासगाव 37, वाळवा 59, सांगली 187, मिरज 75 असे आहेत.
आजच्या मृतांमध्ये मिरज,कवठेएकंद, मालगाव, चिकुर्डे, बागणी,आष्टा, आमनापूर, कोकळे,तुंग,सावळज, सावळवाडी, कसबे डिग्रज, रेठरे धरण, सांगली, भालवणी येथील 24 रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आज अखेरची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 576, जत 404, कडेगाव 448, कवठेमहांकाळ 645, खानापूर 542,मिरज 1493,पलूस 611,शिराळा 623,तासगाव 796,वाळवा 1165,मनपा 7248 आडे आहेत. आज 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.