नवी दिल्ली : रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५ हजार २१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याची बातमी आहे.
पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रस्तावाला अर्थखाते, गृहखाते तसेच मध्यवर्ती बँकेने जुलैमध्ये मान्यता दिल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. एक वर्षापूर्वी सदर प्रस्ताव सरकारपुढे विचारासाठी ठेवण्यात आला होता. मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.
या उत्पन्नातून कर्जाचा बोजा कमी करणं व समूहाची मुख्य कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये हिस्सा वाढवणं हा अंबानींचा उद्देश राहिला आहे. या व्यवहारानंतर जिओ ही या नवीन कंपनीची ३० वर्षांसाठी टेनंट राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.