सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वेग वाढला आहे. रोजच कोरोनाबळीच्या संख्येत मोठी भर पडत आहे. आजच्या अहवालानुसार सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. नवीन 340 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज एकूण 2 हजार 937 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 597 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 12 हजार 849 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 373 एवढी झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आजच्या अहवालातील कोरोनाबळी
आज मोडनिंब (ता. माढा) येथील 85 वर्षाचे पुरुष, कोर्टाजवळ मेटकरी गल्ली मंगळवेढा येथील 78 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 46 वर्षांची महिला, सिद्धार्थनगर कुर्डूवाडी येथील 40 वर्षाची महिला, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 51 वर्षाचे पुरुष, भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील 68 वर्षाची महिला, बारंगुळे प्लॉट बार्शी येथील 52 वर्षांचे पुरुष, सरपडोह (ता. करमाळा) येथील 65 वर्षाचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 64 वर्षांचे पुरुष, कासेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष तर बागवान गल्ली अक्कलकोट येथील 60 वर्षाची महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.