सोलापूर : महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने फौजदार चावडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
भाजपचे आमदार राम कदम हे कंगना रनौत यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांनी कंगना रनौत यांची पाठराखण केली असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करून सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षड़यंत्र आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कृतीची दखल घेऊन शासनाने व विधानसभा अध्यक्षांनी राम कदम यांच्या सदस्यत्वाच्या बाबतीत कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, विभागीय संघटक महेश धाराशिवकर, परिवहन सदस्य विजय पुकाळे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.