सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक बाधित आढळण्याचा उच्चांक आज घडला आहे. महापालिका हद्दीत 72 तर ग्रामीण भागात 462 बाधित आढळल्याने आज जिल्ह्याच एकूण आकडेवारीत 534 बाधितांची भर पडली आहे. ग्रामीणमधील 13 तर महापालिका हद्दीतील 1 अशा एकूण 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक बाधित एकाच दिवशी आढळण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 7 हजार 32 तर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 13 हजार 672 झाल्याने बाधितांची एकूण संख्या 20 हजार 704 झाली आहे. महापालिका हद्दीतील 427 तर ग्रामीण भागातील 395 अशा एकूण 822 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोना चाचणीचे 224 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 125 अहवालांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 9 हजार 294 तर महापालिका हद्दीतील 5 हजार 870 असे एकूण 15 हजार 164 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 4 हजार 718 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 735 तर ग्रामीण भागातील 3 हजार 983 रुग्णांचा समावेश आहे.
* मंगळवेढ्यात उपचाराअभावी मृत्यू
मंगळवेढा तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
जवळपास एक तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तासाभराने खाजगी वाहनांचा आधार घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला.