पालघर : वाडा तालुक्यातील अनेक भागांत आज संध्याकाळी विजांच्या गडगटासह पाऊस सुरू होता. या वेळी संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान आंबिस्ते येथील एका वस्तीवर ६ जणांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वीज अंगावर कोसळल्याने सागर शांताराम दिवा (वय १७) या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर संदीप अंकुश दिवा (वय २५), अनंता चंद्रकांत वाघ (वय २४), रविंद्र माधव पवार (वय १८), नितेश मनोहर दिवा (वय १९), सनी बाळू पवार (वय १८) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
डहाणू तालुक्यातील तवा (नमपाडा) येथे वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा (वय अंदाजे २० ते २२ वर्ष) याचा मृत्यू झाला तर अनिल सुधाकर धिंडा (वय अंदाजे १८ ते १९ वर्षे हा जखमी झाला आहे. वेदांत रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.