मुंबई : आत्महत्या खरोखरच देशासमोरचं नवं संकट म्हणून समोर येतंय का? वाढत्या आत्महत्येचे कारणं काय आहेत? अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. याच निमित्ताने गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. यात दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात मागील वर्षात एक लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्या पैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. तसंच आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल 40 पट जास्त असते असं एका अभ्यासात आढळून आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करुन आपलं जीवन संपवतात. म्हणजे जगात दर 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करत होतो. यावरुन आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे.
देशातल्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरात म्हणजेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांमध्ये 36.6 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.
* गृहिणीची संख्या जादा
2019 मध्ये आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या 15.4 टक्के आहे. महाराष्ट्रात 13.6 टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू 9.7 टक्के, पश्चिम बंगाल 9.1 टक्के, मध्यप्रदेश 9 टक्के आणि कर्नाटकात 8.1 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहेत. या पाच राज्यात मिळून 49.5 आत्महत्या झाल्या आहेत.
देशात 92 हजार 757 म्हणजे 66.7 टक्के विवाहितांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर 32 हजार 852 म्हणजेच 23.6 टक्के अविवाहितांनी आत्महत्या केली आहे.
एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या 92 हजार 083 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याचं प्रमाण 66.2 टक्के आहे. तर एक लाख ते पाच लाख आर्थिक उत्पन्न असलेल्या देशातील 41 हजार 197 जणांनी आत्महत्या केली आहे, त्याचं प्रमाण हे 29.6 टक्के आहे. या अभ्यासानुसार आत्महत्या हे देशासमोरचं नवं संकट म्हणून उभं राहत आहे.
* आत्महत्येची प्रमुख कारणे
– कौटुंबिक आणि वैवाहिक कारणांमुळे 37.9 टक्के आत्महत्या झाल्याचं समोर
– आजारपणातून 17.1 टक्के आत्महत्या
– व्यसनाधीनता 5.6 टक्के आत्महत्या
– प्रेमभंगातून 4.5 टक्के आत्महत्या
– कर्जबाजारीपणामुळे 4.2 टक्के आत्महत्या
* आत्महत्येचे वय
– 18 पेक्षा कमी वर्षे वय – 9612 म्हणजेच 6.9 टक्के
– 18 ते 30 वय – 48 हजार 774 म्हणजे 35.1 टक्के
– 30 ते 45 वयोगटात 44 हजार 287 म्हणजे 31.8 टक्के