नवी दिल्ली : सेंट्रल क्राईम पथकाने एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला राघिनीचा मित्र रवीशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान त्याने राघिनीचं नाव घेतलं. त्यामुळे तिला देखील अटक करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता रागिनीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. नुकताच एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. या ड्रग्स गँगमध्ये रागिनीची भूमिका काय आहे? याचा तपास आता केला जाणार आहे.
अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि अन्य आरोपींना ड्रग्स प्रकरणात कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यानंतर पराप्पना अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात आणले गेले असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
सेंट्रल क्राईम पथकाने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील आहे. परिणामी क्राईम ब्रांचने तिला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं.
शुक्रवारी सकाळी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु चौकशीसाठी ती गैरहजर राहिली. शिवाय तिने सोमवारपर्यंत वेळ देखील मागितला होता. दरम्यान क्राईम पथकाने तिचा मित्र रविशंकर याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर पोलिसांनी राघिनीचा घरी छापा टाकला व तिला अटक केली. अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे.