सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार केंद्रीय महासचिव कॉ. सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांवर खोटे आरोप केले. शिवाय दिल्ली दंगल प्रकरणात नाव गोवले आणि दोषारोपपत्र दाखल केले. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे झेंडे, काळ्या फिती लावून अमित शहा व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खोटे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कॉ. सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवंतांची नावे दोषारोपपत्रातून काढावीत अशी मागणी यावेळी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. तरुण कार्यकर्ते गगनभेदी आवाजात अमित शहा मुर्दाबाद, दिल्ली पोलीस प्रशासन होश में आहो, सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, घोषणा देत पुतळ्याचे दहन केले.
यावेळी माकपाचे सर्व नेते व कार्यकर्ते काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या फिती, काळी झेंडे दाखवून केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांची झटापट झाली. यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केले. यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले.
यावेळी नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, महमद हनीफ सताखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, माशाप्पा विटे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, अशोक बल्ला, दाउद शेख, नरेश दुगाणे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, विल्यम ससाणे, बापू साबळे, दत्ता चव्हाण, अकिल शेख, बापू कोकणे, जावेद सगरी, विक्रम कलबुर्गी, वासिम मुल्ला, हसन शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.