नाशिक : तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या असून त्यात 3 गोळ्या लागल्याने कुटे यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी संशयित सख्या भावासह साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले.
हत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनं गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.