सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली. त्यांच्या रिक्तजागी कोणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता होती. ब-याच दिवसापासून रिक्त असलेल्या या जागी आता साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
तेजस्वी सातपुते यांच्या सोलापुरातील बदलीनंतर अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाली असून त्यांना त्याच ठिकाणी सहायक पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
मूळच्या नगर जिल्ह्यातील शेगांव येथील असलेल्या तेजस्वी सातपुते यांची सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी ते पदभार घेणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेजस्वी सातपुते यांनी पुणे शहरात वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तपदी काम करत असताना हेल्मेटसक्ती, कमीत कमी होर्नचा वापर करण्यासाठी तरुणाईला प्रोत्साहन देणे तसेच वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती व समोपदेशन कार्यशाळा आयोजित करणे यासारखे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले.
पुढे साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाल्यावरही तेथील गुन्हेगारी विश्वाची पाळेमुळे खणून काढली. एक कडक शिस्तीच्या, धडाडीने काम करणाऱ्या, प्रसंगी कठोर निर्णय घेणाऱ्या कर्तव्यनिष्ठ महिला पोलिस अधिकारी म्हणून त्या प्रसिध्द आहेत.