सोलापूर : येथील वीरशैव लिंगायत समाजातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक नंदकुमार सि. मुस्तारे यांचे आज गुरुवारी सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व पाच बंधू असा परिवार आहे.
नंदू मुस्तारे म्हणून परिचित असणारे नंदकुमार हे गेल्या चाळीस वर्षांपासून समाज जीवनात वावरत होते. सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूर शहराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्यवर्ती बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे कसबा गणपती प्रतिष्ठानचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते.
सोलापूर महानगरपालिकेवर त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता. त्यांचा मित्र परिवार अतिशय दांडगा असून त्यांनी सर्वपक्षीय मित्रमंडळी जमवली होती. त्यांचे संघटन कौशल्य ही वाखाणण्याजोगे होते.