नाशिक : भाजपामध्ये बहुजन नेतृत्व नकोच आहे. २०१४ नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल, असंही खडसे म्हणाले.मनातली कायम असलेली सल एकनाथ खडसेंनी नाशिक दौऱ्यावर असतांना बोलून दाखवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अहो ज्या भाजपला शेटजी-भटजी आणि लाटजीचा पक्ष म्हटलं जात होतं. ज्या पक्षाची ओळख फक्त मारवाडी, भटांचा पक्ष अशी होती. ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम पण या लोकांना त्याची जाण आहे का ? म्हणजे यांना अजूनही बहुजन नेतृत्व नकोच आहे पक्षात आणि समजा पक्षात घेतला तरी मिरवायला हेच लोकं मग इतर लोकांनी फक्त यांच्या सतरंज्या उचलायच्या का ? असा घणाघाती आरोप करत आपल्या मनातली कायम असलेली सल एकनाथ खडसेंनी नाशिक दौऱ्यावर असतांना बोलून दाखवली.
एकनाथ खडसे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी वार्तालाप करतांना मनातली सगळी सल बोलून दाखवली. भाजपला पूर्वी मारवाडी, भट-ब्राह्मणांचा, शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी ओळख होती. त्या कालखंडापासून आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा होता तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला,पण यांना त्याची किमंत आहे का? असं एकनाथ खडसे यांनी सवाल उपस्थित केला.