विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे कामती मोहोळ रोडवरील कामतीपासून काही अंतरावर जावेद सय्यद यांच्या टायर व रिमोल्डिंग वर्कशॉपला आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे विजापूर, कामती मोहोळ रोडवर, गाड्यांची लाईन दोन्ही बाजूने लांब दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुकानात मोठ्या प्रमाणात टायर, ट्यूबसह विविध प्रकारच्या मशीन या आगीत जळून खाक झाल्या. स्थानिक नागरिकांनी व कामती पोलीस प्रशासनाने काही वस्तू आगीतून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्याने सर्वकाही जळूनखाक झाले.
जावेद सय्यद यांनी मागील आठवड्यातच दुकानाचे नूतनीकरण केले होते. पंधरा ते वीस लाखाचे नवीन टायर बनवले होते. नवीन टायरपैकी अजून एक ही टायर विकले नव्हते. या आगीची माहिती कळताच कामती पोलीस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामकदलाच्या व डीबीएल कंपनीच्या दोन टँकर च्या साह्याने व कामती पोलीस कर्मचारी व स्थनिक नागरिकानी आग विझवण्याचा प्रयन्त केला.