मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलतांना नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्रांवर सडकून टीका केली होती.त्या टिकेलाच उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खास पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी बोलतांना राणे म्हणाले की ‘ उद्धव ठाकरे म्हणजे शिवराळ भाषेत काहीही बरळणारं व्यक्तिमत्व आहे,अशा खरमरीत शब्दात टीका केली.
राणे पुढे म्हणाले की ‘ या उद्धवची लायकी नाही नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची कारण तुम्ही ५६ आमदारांच्या पाठींब्यावर आज मुख्यमंत्री झालात ते फक्त मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यामुळे काहीही बोलत बसू नका.
उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे.आज बाळासाहेब ठाकरे असते तर या माणसाला साहेबांनी मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.आणि हा काय बाता मारतो.मी जर माझं तोंड उघडलं तर मुख्यमंत्री पद तर सोड नुसता पळत फिरशील,अशा खालच्या शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच फैलावर घेतले.
उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.
दरम्यान, मी राज्यसभेचा खासदार आहे आणि संजय राऊत देखील त्याच सभागृहाचा खासदार आहे.पण त्याला कळत काय ? अहो तिकडं काय घडतं हे याला आम्ही सांगतो आणि हा सामनात अग्रलेख लिहून काहीही मांडणी करतो, संजय राऊत हा काय माणूस हे ! काय बोलतो,कसं बोलतो,हे खरच वेगळचं आहे या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांना चांगलेच सुनावले.
* उद्धवने बाळासाहेबांना छळले
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं आहे. 2005-06 ची घटना सांगतो. बाळासाहेबांना वाटत होतं की, सेनाभवनासमोर दसरा मेळावा घ्यावा. नवीन शिवसेना भवन बांधून झालं होतं. तेव्हा नेत्यांना बोलावून बाळासाहेबांनी सर्व नेत्यांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सामना वृत्तपत्रात आलं की, शिवाजी पार्कात दसरा होईल, असं आलं. बाळासाहेबांना धक्का बसला. मी घेतलेले निर्णय बदलले जातात, असं साहेबांना वाटलं.” 27 जुलै 2006 साली वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी नवीन शिवसेना भवनाचं उद्घाटन केलं,” असाही गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.
* ‘मातोश्री’च्या आतलं, बाहेरचं सगळं बाहेर काढेन
मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिलं होतं, असं नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.