मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं. राज ठाकरेंनी राज्यपालांशी वाढीव वीजबिलासह दूधदरवाढीसंदर्भात चर्चा केली. यावर राज्यपालांनी शरद पवारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
या भेटीदरम्यान राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा सल्लाही दिला आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी शरद पवार यांच्याशी बोलेन. फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेईन.
वीज बिलांचा विषय मनसेनं लावून धरला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. अदानी, बेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयी राज्य सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवदेन राज्यपालांना भेटून दिलं असल्याचं, राज ठाकरे म्हणालेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. राज ठाकरे पहिल्यांदाच राज्यपालांना भेटणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली.
* कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही – राज ठाकरे
राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.
ओला व सुका दुष्काळ यांमुळे शेतकरी आगोदरच त्रासलेल्या आहे. त्यामध्ये त्यांच्या दुधाला देखील सुमारे १७ ते १८ रुपये दर मिळत आहे. व दुध संकलन करणाऱ्या अनेक कंपन्या या मधे मोठा नफा कमवत आहेत, तर शेतकऱ्याला सुमारे २८ ते ३० रुपये दर द्यावा असे राज ठाकरे यांनी कोश्यारीना सांगितले आहे.
* राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिलाय : राज ठाकरे
राज्यपालांच्या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचं कारण उघड केलं. लॉकडाऊननंतर राज्यातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. ही बिले कमी व्हावीत आणि नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मनसेने आंदोलने केली. अदानीसह अनेकजण भेटूनही गेले. एमईआरसीने मान्यता दिली तर आम्ही वीज बिल कमी करू असं ते म्हणाले. त्यांचे लेखीपत्रंही आमच्याकडे आहे. तर त्या कंपन्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, असं एमआरसीने म्हटलं आहे. कंपन्या आणि सरकारचं एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. हा विषय आज राज्यपालांच्या कानावर टाकला. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही पवारांशी बोलून चर्चा करू, असं राज ठाकरे म्हणाले.