जौनपूर : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांनी जौनपूरमध्ये या गुन्ह्यात सहभागी होणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. अशा लोकांनी ‘रामनाम सत्य है’च्या यात्रेसाठी तयार राहावे, अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी सक्त ताकीद दिली आहे.
लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याची परवानगी दिली जाता कामा नये, असे काल शुक्रवारी अलाहाबाद हायकोर्टाने आदेश दिले आहेत. यामुळे आम्ही लव्ह जिहाद हा प्रकार सक्तीने रोखण्याचे काम करू असा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आम्ही एक कडक कायदा तयार करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ‘मिशन शक्ती’ चा कार्यक्रम
छद्म वेशात नाव लपवून जे लोक मुलींच्या जीवनाशी खेळतात, अशांची ‘राम नाम सत्य हैं’ ची यात्रा निघणार आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. आम्ही ‘मिशन शक्ती’ हा कार्यक्रम याचसाठी चालवत आहोत. प्रत्येक आई-बहिणीच्या सुरक्षेची हमी देणे हाच ‘मिशन शक्ती[ या कार्यक्रमाचा उद्देश आहे. काहीही झाले तरी त्यांची सुरक्षा करणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आम्ही त्यांच्या सन्मानाची सुरक्षा करू. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल आणि बहिणी-मुलींचा सन्मान होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.