मुंबई : जातीय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेत ट्विट करत शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांकडून अटक होताच राज्यातील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जातिय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. तुकडे तुकडे गँग असो किंवा पालघरचे हत्यारे यांना आश्रय देणारे कोण आहेत, असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी ट्विट मध्ये केली आहे.
तसेच, काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कमकुवत सरकार महाराष्ट्राला आणिबाणीच्या वाटेवर नेत आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याची भाषा करणारे कुणीकडे लपुन बसले आहेत, असा सवाल उपस्थित करत आज सगळे ढोंगी चेहरे समोर येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
यासोबत मराठी भाषेत ट्विट करत, आणिबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. अशा आशयाचे ट्विट करत अर्णब गोस्वामींच्या अटकेला विरोध दर्शवला आहे.