मुंबई : एसटी महामंडळाच्या कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी (जळगाव आगार) यांनी आज सोमवारी दुर्दैवी आत्महत्या केली. आपल्या मृत्यूला ठाकरे सरकारचं जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. पण यातही आता राजकारण डोके वर काढू लागले आहे. आता भाजपने जो न्याय अर्णब गोस्वामी यांना लावला तोच न्याय अनिल परबांना लावणार का? असा सवाल उपस्थित करीत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने येथेही तोच न्याय लावून चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी,’ अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौधरी हे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. आर्थिक संकटातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहिली आहे.
एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. एसटी संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती’, असं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.