मुंबई : कोरोनाच्या जाळ्यात सामान्यांप्रमाणे बरेच सेलिब्रेटीही अडकले आहेत. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आदीसह बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळेपूर्वी त्यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड करत आहे. चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, आचार्यच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी मी कोव्हिडची टेस्ट केली. टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मला कोणत्याच प्रकारचे कोरोनाचे लक्षण नाहीत. आता मी होम क्वारंटाइन आहे. मागील ४-५ दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी टेस्ट करून घ्या, असे आवाहन केले आहे. चिरंजीवी यांनी पुढे म्हटले की, मी माझ्या आरोग्याबद्दल लोकांना जागरूक करेन.
चिरंजीवी यांच्या या ट्विटनंतर सर्वजण अण्णा (मोठा भाऊ)ना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. चाहत्यांनी चिरंजीवी यांना काळजी घ्यायला सांगितले आहे. चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चिरंजीवी त्यांचा आगामी चित्रपट आचार्यमुळे चर्चेत आहेत. याशिवाय ते चिरू १५२मध्ये काम करताना दिसणार आहे.