मुंबई : रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी कोविडकरिता २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ इतका निधीचा धनादेश शरद पवार यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार शरद पवार यांनी सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २,७५,९२,८२१/- (रुपये दोन कोटी पंचाहत्तर लाख, ब्याण्णव हजार आठशे एकवीस) इतकी रक्कम संस्थेचा अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.