मोहोळ : तेलंगणाला डेडबॉडी
घेवून निघालेल्या ॲम्बुलन्स व मालट्रक यांच्यात मोहोळजवळ झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार तर नऊजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मृतात ॲम्बुलन्स चालकाचाही समावेश आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ॲम्बुलन्स (एमएच १२ आर एन ६३८७) पुण्याहून हैदराबादकडे डेडबॉडी घेवून निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ कन्या प्रशाला चौकात स्पीड ब्रेकरजवळ पुढे असलेल्या मालट्रक (क्रमांक एम एच ४३डीजे ४५oo ) वर पाठीमागून आदळला. यात रामलू धनसिंग राठोड (वय ४५) श्यामलू सोमनाथ राठोड वय (५४) आशा सुभाष राठोड (वय ४०), लोकेश धमसिंग राठोड (वय ३९), किसन रामलू राठोड (वय ३९), निलेश भानू पवार (वय३३), रवि गोपाल राठोड वय (३२),गोपाल धनसिंग राठोड (वय ४५),गणेश धनसिंग राठोड (वय ४५) हे जखमी आहेत तर रवी माणिक राठोड, बुद्धीबाई यलना पालते (वय४५) व अम्बुलन्सचा चालक ( ओळख पटली नाही ) असे तीन जण मयत झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही घटना शनीवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुभाष दरिया राठोड या कॉल ट्रॅक्टरचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने पिरंगुट पुणे येथे मयत झाला होता. त्याची डेडबॉडी घेऊन त्यास तेलंगणाला घेऊन निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.