कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे मोदींकडे केल्या आहेत. त्यानंतर, पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी मोदींना पत्र लिहिले असून भावनिक मुद्द्यांना हात घातला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीसंदर्भात हे पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच, सुभाष चंद्र बोस यांच्या निधनाचे गुढ शोधून काढावे, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. टाइम्स नॉऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी मुखर्जी आयोगाच्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अहवालात कुठलेही कारण किंवा माहिती न देताच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मृत घोषित केलं आहे.
* मृत्यूचे गुढ उलगडण्याचीही मागणी
नेताजी यांचे वंशज सूर्य बोस आणि माधुरी बोस यांनी एक खुले पत्र लिहिले आहे. त्यानुसार, 8 नोव्हेंबर 2005 च्या न्यायमूर्ती मनोज कुमार मुखर्जी यांच्या अहवालात असे नमूद केली की, नेताजी यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसून टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजी यांच्या नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, अशी मागणी केली आहे.