कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सत्ता खेचण्याचं भाजपाचं स्वप्न आहे. तर, दुसरीकडे एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनीही बिहारनंतर आपला मोर्चा बंगालच्यादिशेने वळवला आहे.भाजपच्या पराभवासाठी औवेसींनी पुढाकार घेतला असून ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात दिला आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी आमच्याकडून तृणमूल काँग्रेसल मदत करण्यात येईल, असे औवेसी यानी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बिहारमधील सिमांचल भागात 5 जागांवर विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या पक्षाचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच, पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये आपण उमेदवार उभे करणार असल्याचं औवेसी यांनी म्हटलंय. त्यासाठी, एमआयएमची नजर अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तरी दिनाजपूर येथे आहे.
ममता बॅनर्जी यांनी नुकतेच एमआयएम पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता, काही बाहरी लोकांना परेशान करणार असल्याचं ममता यांनी म्हटलं होतं. तसेच, राज्यातील जनतेला बाहरी म्हणजे परराज्यातून येणाऱ्या पक्षाला विरोध करण्याचंही सांगितलं होतं.
बंगालमधील निवडणुकांत एमआयएमचा प्रवेश हा ममता बॅनर्जींच्या टीएमसीसाठी धोक्याची घंटा असल्याचं टीएमसीला वाटतंय. कारण, यंदा भाजपा विरुद्ध टीएमसी असा थेट सामना रंगणार आहे. तर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची लढाईसुद्धा तृणमूलसोबतच आहे. त्यामुळे, औवेसींचा एमआयएम पक्ष थेट निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यास त्याचे नुकसान तृणमूल काँग्रेसलाच होणार आहे.