नवी दिल्ली : 2020 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसणार आहे. हा दिवस दिवाळीनंतर अगदी 16 दिवसांनी येत आहे. आपल्याला माहीत असेल की दिवाळी अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते आणि चंद्रग्रहण त्याच्या 16 दिवसानंतर होणार आहे. तर 14 डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. मात्र या दोन खगोलशास्त्रीय घटना भारतातून दिसणार नाहीत.
चंद्रग्रहणानंतर पुढील महिन्याच्या 14 तारखेला म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण होईल. या दोन खगोलशास्त्रीय घटना भारतातून दिसणार नाहीत. जगातील इतर देशांमधून पाहिल्या जाऊ शकतात. भारतात ग्रहणं दिसणारच नसल्यामुळे भारतात सूतक पाळण्याचा संबंध नाही. परंतु, जगातील इतर भागात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणांमुळे सुतक कालावधी मानला जाईल आणि तिथले श्रद्धावान ग्रहणकाळात कोणतंही शुभ कार्य करणार नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खगोलशास्त्रीय तज्ञांच्या मते, या वर्षी 2020 मध्ये 6 ग्रहणं होणार होती. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासह आतापर्यंत चार ग्रहणं लागली आहेत. यावर्षी 30 नोव्हेंबरला चंद्रग्रहण होईल. ज्योतिषांचे म्हणणे आहे की ग्रहण लागण्यामुळे सुतक कालावधी लागू होणार नाही. अशा परिस्थितीत भारतातील लोकांना चिंता करण्याची गरज नाही, कारण हे चंद्रग्रहण दिसणार नाही.
नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी लागणारं हे चंद्रग्रहण आशियातील काही देशांमध्ये तसंच अमेरिकेच्या काही भागांतही दिसेल. याशिवाय हे ग्रहण ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशातही दिसेल. 30 नोव्हेंबरला हे चंद्रग्रहण दुपारी 1.04 वाजता सुरु होईल व 3.13 वाजता ह्याचा मध्यकाल होऊन हे ग्रहण संध्याकाळी 5.22 वाजता समाप्त होईल.