पंढरपूर : कोरानाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची चैञी, आषाढी याञा रद्द झाली. याच धर्तीवर कार्तिकी याञा देखील रद्द करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर शहरासह आसपासच्या ८ ते १० गावांमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान संचारबंदी लागु करण्यात येणार आहे.
याचबरोबर राज्यभरातून पंढरपूरला येणारे सर्व बसेस २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पञकार परिषदेत दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे उपस्थित होते.
कार्तिकी याञेसाठी पंढरपूर शहरात दिंड्या येवु नयेत, यासाठी शासनाने बंदी घातली आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने तिहेरी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १०० पोलीस अधिकारी, १२२१ पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एक एसआरएफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.