नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आता काही दिवसांसाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाणार आहेत. त्यानुसार आता सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. दुपारी चार वाजता दोघेही गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राजधानी दिल्लीतील हवेचे प्रदुषण खूपच वाढले असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीला हवामान मानवणारे नाही. त्यामुळे त्यांना काही काळासाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
राजधानीतील हवा प्रदूषणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी काही दिवसांसाठी गोव्यात दाखल झाल्या. राहुलही त्यांच्यासोबत आहेत. ‘सोनिया यांना अस्थमाचा त्रास आहे. शिवाय, छातीत संसर्ग आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉक्टरांनी त्यांना काही दिवस दिल्लीत न राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, त्या गोव्यात गेल्या असून, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारल्यानंतर त्या परत येतील,’ असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
सोनिया गांधी यांनी गेल्या ऑगस्टमध्येच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तेव्हापासून त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यांच्या छातीत वारंवार संसर्ग होत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सध्याच्या प्रदुषित हवेबद्दल डॉक्टरांनी त्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत त्यांना काही दिवसांसाठी दिल्लीच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.