सोलापूर : कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान पंढरीत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी 25 ते 27 नोव्हेंबर हे 3 दिवस विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन पास देखील बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला असल्याची माहिती सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शासन आदेशानुसार 16 नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना खुले करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी दर्शन पासचे ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आले आहे.