नवी दिल्ली : पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील जनतेला कोरोनावरील लस पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनतेला ही लस पुरवली जाईल, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन केले. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावं. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब असल्याचे सांगितले.
“पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत देशातील जनतेला लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये २५ ते ३० कोटी जनतेला लस पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे.”
डॉ. हर्षवर्धन – केंद्रीय आरोग्यमंत्री