सोलापूर : दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांचा यात समावेश आहे. शहरातील विद्यार्थ्यांसाठी मात्र हे लाभ लागू नाही.
यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यांचा यात समावेश आहे.
सोलापुरातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.