लखनौ : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे मोठा अपघात घडला आहे. या अपघातात ८ ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकचा टायर फाटल्याने झाला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी पहाटे कोशांबीच्या कडाधाम कोतवाली भागात देवीगंज चौकात घडली.
हा अपघात इतका भीषण होता की जागीच ८ लोक ठार झाले आणि परिसरात किंचाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कार मधील सहा महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. स्काॅर्पिओमध्ये दहा जण बसलेले होते. कारवर ट्रक कोसळत असल्याचं पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि आपले प्राण वाचवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये महिला आणि मुली होत्या. या सर्वजणी शहजादपूरहून देवीगंज येथील महेश्वरी गार्डन येथे आयोजित एका विवाह सोहळ्यावरून परतत होत्या. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाळूने भरलेला एक ट्रक टायर फुटल्यानंतर नियंत्रण गमावल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर उलटला.
पोलिस अधिकाऱ्याने या अपघाताची माहिती देताना सांगितले की, ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. हा ट्रक अतिशय जलद गतीने धावत होता. अचानक त्याचा टायर फुटला आणि ट्रक बाजूच्या स्कॉर्पिओवर उलटला. या स्कॉर्पिओत १० लोक होते. त्यांपैकी आठजण जागीच ठार झाले.