नवी दिल्ली : आघाडीचं सर्च इंजिन गुगलने दरवर्षीप्रमाणे यंदाही या वर्षातील बेस्ट मोबाइल अॅप्सची यादी जाहीर केली आहे. गुगलने बेस्ट अॅप्स, गेम्स ऑफ द ईयर आणि चॉइस अॅप अवॉर्ड 2020 अशा तीन लिस्ट जारी केल्या आहेत. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या लाखो अॅप्समधून लोकप्रियतेच्या आणि डाउनलोड्सच्या आधारावर गुगलने या अॅप्सची निवड केली आहे.
गलने जाहीर केलेल्या यादीनुसार, ’स्लीप स्टोरीज फॉर काल्म स्लीप -मेडिटेड विथ व्यासा’ हे अॅप 2020 मधील बेस्ट अॅप ठरलंय. तर, ’लिजेंड्स ऑफ रुनेतेरा’ हा यावर्षीचा ’बेस्ट गेम’ ठरला आहे. याशिवाय ‘फन’ कॅटेगरीमध्ये ’प्रतिलीपी’ हे बेस्ट अॅप ठरले आहे. प्रतिलीपी अॅपवर तुम्ही ऑडिओ/टेक्स्ट फॉर्मेटमध्ये पुस्तकं वाचू शकतात. हे अॅप हिंदी, मराठीसह 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात पॉडकास्टची सुविधाही असून एक कोटींपेक्षा जास्त डाउनलोड झालं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुगलचा यावर्षीचा ‘चॉइस अॅप अवॉर्ड’ माइक्रोसॉफ्ट ऑफिसला भेटलाय. तर, चॉइस गेम ऑफ 2020 अवॉर्डसाठी ’वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीप 3’ ची निवड झाली आहे. याशिवाय ’पर्सनल ग्रोथ’ कॅटेगरीमध्ये ’अपना जॉब सर्च- रोजगार’ या अॅपने बाजी मारली आहे. याशिवाय गुगलने अन्य काही कॅटेगरीमधील बेस्ट अॅप्सची यादीही जाहीर केली आहे.
* अशी आहे यादी
बेस्ट Everyday Essentials अॅप्स कॅटेगरी : Koo: Connect with Indians in Indian Languages, Microsoft Office, The Pattern, Zelish – Meal Planning, Grocery Shopping & Recipes, आणि Zoom Cloud Meetings.
बेस्ट पर्सनल ग्रोथ अॅप्स कॅटेगरी : Job Search App, Bolkar App: Indian Audio Question Answer, Mindhouse – Modern Meditation, MyStore, आणि Writco.
बेस्ट हिडन(Hidden) गेम्स कॅटेगरी : Chef Buddy, Finshots, Flyx, goDutch आणि Meditate with Wysa
बेस्ट कंपिटेटिव (Competitive ) गेम कॅटेगरी : Bullet Echo, KartRider Rush+, Legends of Runeterra, Rumble Hockey आणि Top War: Battle .