पुणे : धुळे – नंदुरबारमधील निकालाचं आश्चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे, नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेलं यश महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच एकत्रित येऊन वर्षभर केलेलं काम लोकांनी स्वीकारलं आहे. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले, मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका पवार यांनी केली.
* महाविकास आघाडीचा सर्वात मोठा विजय
धुळे, नंदुरबार निर्णय हा काय अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्याच्या हाती मिळालं. तो त्यांचा खरा विजय नाही. गेल्या वर्षभर काम करून दाखवलं. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. तो काँग्रेसनं जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा सर्वात मोठा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारनं एकत्र काम केलं त्याचं हे यश असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. पुणे मतदारसंघतही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारला त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदलतं आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करत शरद पवार यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* चंद्रकांत पाटलांनाही टोला
शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांना विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. चंद्रकांतदादा मागच्या वेळेस विधानपरिषदेला कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.