वाशिम : येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यासोबत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर एक जागा मिळवली आहे. तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे.
आपण विधानपरिषदेच्या चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेतही आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
* मुंबई महापालिका निवडणुकीत फौज उतरणार
हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षापूर्वी केवळ ४ जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत ४८ जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे.पी.नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरु शकतात, तर आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरु शकतं याचा अंदाज आता बांधला जावू शकतो.