अक्कलकोट : तालुक्यातील हसापूर येथील दीक्षित सोमनाथ दुपारगुडे यांच्या राहत्या घराला शनिवार (काल) रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटने आग लागली. घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले. आठवड्याअगोदर घरात लग्नाची रेलचेल, गोंधळ असणा-या घरालाच अशी आग लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असा प्राथमिक पंचनामा करून तहसील कार्यालय येथे तलाठी हसापुर नूरुद्दीन मुजावर यांनी सादर केला आहे. गेल्या आठवड्यात लग्न झाल्याने लग्नात दिलेल्या सर्व वस्तूं जळून खाक झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दीक्षित सोमनाथ दुपारगुडे यांच्या हसापूर येथील राहत्या घराला रात्री ठीक आठ वाजता शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. त्यात त्यांचे रोख रक्कम ६५ हजार व पाच तोळे सोने व पंधरा तोळे चांदी व घर उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाले. यात पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या जबाबात म्हटले आहे. पुढील कार्यवाहीसाठी जबाब पंचनामा सहीत सादर केला आहे.